पॅरिस- लाल मातीवरचा बादशहा अशी सार्थ ओळख असलेला स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदार याने दुखापतीच्या कारणामुळे फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच 2024 हे साल माझ्या कारकीर्दीचे अखेरचे वर्ष असेल असे संकेतही त्याने दिले आहेत.
यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत त्याला दुखापत झाली असून यातून तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. अशा स्थितीत आपण फ्रेंच ओपन इतकी मोठी स्पर्धा खेळण्याचा धोका पत्करणार नाही. या स्पर्धेनंतर डेव्हीड करंडक टेनिस स्पर्धा होत असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी मी आशावादी आहे, असे नदालने सांगितले.
फ्रेंच ओपनच्या इतिहासात सर्वाधिक 14 वेळा विजेतेपद मिळवलेला नदाल लाल मातीच्या कोट्रवरचा राजा समजला जातो. आता त्याने माघार घेतल्यामुळे सर्बियाचा नोवाक जोकोवीच व रशियाचा मेदवेदव यांच्यात स्पर्धा रंगेल अशी चिन्हे दिसत आहेत. नदालने आजवर फ्रेंच ओपनवर सातत्याने वर्चस्व राखले आहे.
त्याच्या विरोधात रॉजर फेडरर, जोकोवीच, मेदवेदेव अशा जागतिक किर्तिच्या अनेक टेनिसपटूंनी लढा दिला होता मात्र, जेव्हा फ्रेंच ओपन स्पर्धेत नदाल कोर्टवर उतरतो तेव्हा तो या अन्य खेळाडूंपेक्षा अत्यंत वेगळा भासतो, एक वेगळाच खेळ त्याच्याकडून घडतो व त्यामुळेच त्याच्या वेगवान सर्व्हिससमोर भले भले खेळाडू देखिल सहज पराभूत होताना दिसतात.