सिध्दीविनायकाच्या चरणी 35 किलो सोने

मुंबई : देशातील श्रीमंत देवालयात सिध्दीविनायक मंदिराचा समावेश होतो. या मंदिरात एका भाविकाने 35 किलो सोने दान दिले. या सोन्याची किंमत 14 कोटी रुपये आहे.

सिध्दी विनायकाच्या चरणी भक्त दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे दान करतात. काहीजण रोकड स्वरूपात तर काही जण सोने, चांदीच्या रूपात देवाला भेट देत असतात. मंदिरातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एकाच व्यक्तीने हे सोने दान केले. सिध्दी विनायक मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी एका व्यक्तीने 35 किलो सोने दान केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला. मंदिराचे दार आणि छतासाठी सोने वापरण्यात येणार असल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले.

14 ते 19 जानेवारी दरम्यान हे मंदीतर दर्शनासाठी बंद होते. त्यावेळी हे काम करण्यात आले. मुर्तीला शेंदूर लावण्याचे आणि प्राणप्रतिष्ठापना करण्याचे काम करण्यात आले.

या देवस्थानला 2017पर्यंत 320 कोटी रूपये देणगी दाखल मिळाले. ते सामाजिक कार्यासाठी वापरण्यात आले. देणगीची ही रक्कम आता 410 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देवस्थानकडे मदतीच्या अपेक्षेने येणाऱ्यांना यातून मदत करण्यात येते. या वर्षात आम्ही 20 हजार जणांना 25 हजार रूपयांची मदत केलीआहे, असे बांदेकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here