शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा सिद्धार्थ शिरोळेंचा प्रयत्न

खासदार काकडे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

पुणे – भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक आनंद छाजेड यांच्या बोपोडीतील निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते बुधवारी झाले.

त्यानंतर बोपोडी भागात पदयात्रा झाली. यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासोबत काकडेही सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवक भापकर, अभय सावंत, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, मधुकर मुसळे, उत्तम बहिरट, ओंकार कदम, विजय शेवाळे, कैलास टोणपे, मनीष बासू, चंद्रकांत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेल्या प्रचारात काकडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचारफेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख आहे ना याकडे काकडेंनी विशेष लक्ष दिले आहे.

दरम्यान, मातंग समाजाचा भव्य मेळावा मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका स्वाती लोखंडे यांनी केले होते. त्यावेळी शिरोळे यांनी मातंग समाजाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राजश्री काळे, हरिभाऊ घोडके, तुषार मोहिते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर किलबिल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्राचार्य रफीक सौदागर यांची शिरोळे यांनी भेट घेतली.

पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा
सिद्धार्थ शिरोळे यांनी डेक्‍कन जिमखाना क्‍लब आणि टिळक स्विमिंग टॅंकवर गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी क्‍लबच्या क्रीडा समिती सदस्य आणि ऍथलेटिक्‍सचे सचिव अतुल रुणवाल, नियामक मंडळ सदस्य प्रमोद बकरे, सरचिटणीस विश्‍वास लोकरे, जलतरण विभागाचे सचिव अमित गोळवलकर, टेनिस समतीचे सल्लागार किशोर परांजपे, सुशील पाटील, विजय गवारे, मिलिंद लुंकड, एस. बी. मंत्री, इंद्रसेन घोरपडे, शरद नाटेकर, अनिल गायकवाड उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)