पुणे – महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू कलादालन येथे दाखल झाले आहेत. याआधी शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिर येथून कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी मिरवणुक काढली.
पुणे शहराचे माजी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विजय काळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शिवाजीनगर मधील नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे , नगरसेवक मधुकर मुसळे, आदित्य माळवे, विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांबरोबरच शिवसेनेचे शिवाजीनगर विभाग प्रमुख राहूल शिरोळे, उपविभाग प्रमुख मंगेश खेडेकर, माजी उपविभाग प्रमुख राजेश मांजरे आदी उपस्थित होते.