मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करताना दिसते. तिचा वेगळ्या ड्रेसमधील हटके अंदाज चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत असतो. नुकताच मौनी रॉयचा हॉट अंदाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लुकमध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.
मौनी रॉयने तिचा काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने एकापेक्षा एक हटके पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मौनीने यात जबरदस्त कातिल अंदाज दाखवला आहेत. यावेळी तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून यावर हिऱ्यांची डिझाइन तयार करण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करत मौनी रॉयने कॅप्शनमध्ये ‘A Lil’ असे लिहिले आहे. मौनी रॉयच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मौनी रॉयने ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा’ मध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. प्रेक्षकांपासून ते चित्रपट समीक्षकांपर्यंत सर्वांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटात ती खलनायक बनली असली तरी अनेकांना तिचे पात्र चांगलेच लक्षात राहते. ‘नागिन’ या मालिकेतून मौनी रॉय घराघरात पोहचली. मालिकांमध्ये यश संपादन केल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.