Ankit Mohan In Rohit Shetty Film| दिगदर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्याला काम करण्याची संधी मिळाली आहे.
‘पावनखिंड’ फेम अभिनेता अंकित मोहन रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन मध्ये झळकणार आहे. या सेटवरील शूटिंगचा फोटो शेअर करत अंकितने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. “एक नवी जबाबदारी, नवा चेहरा, नवीन टीम, नवीन ठेहराव आणि एक नवं नाव!!! छत्रपती शिवाजी महाराज की जय…लवकरच भेटुया”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंकितने पावनखिंडसह फर्जं’, फत्तेशिकस्त सिनेमात देखील काम केले आहे. Ankit Mohan In Rohit Shetty Film|
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगसाठी महाराष्ट्रातील ‘टेम्पल सिटी’मध्ये पोहोचला होता. शूटिंगच्या निमित्ताने रोहित शेट्टीच्या टीमने साताऱ्यातील ‘वाई’ मंदिर परिसर पूर्णपणे उजळून टाकला. शूटिंग सुरू करण्यापूर्वी रोहित शेट्टी आणि करीना कपूर यांनी वाई गावातील 262 वर्ष जुन्या गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. याचे फोटो देखील सोशल मीडियाद्वारे समोर आले होते. यानंतर आता या चित्रपटाबाबत अंकित मोहनने एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. Ankit Mohan In Rohit Shetty Film|
View this post on Instagram
ऐतिहासिक सिनेमासह अंकितने हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘क्रॅक’ सिनेमात तो झळकला होता. यानंतर आता तो रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अजय देवगण, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण यासारखे कलाकार आहेत.
हेही वाचा:
कार्तिक आर्यनच्या हाती आणखी एक चित्रपट; नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर