अणे – बेल्हे (ता जुन्नर) सोमवार (दि 11) रोजी भरलेल्या बाजारामध्ये शुकशुकाट दिसून आला. दिवाळी संपल्यामुळे बाजारात दिवसभर अत्यंत कमी ग्राहक दिसत होते.
या तुलनेत सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) भरलेल्या आठवडे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी उच्चांकी गर्दी झाली होती. या वर्षातली ही बाजारातली उच्चांकी गर्दी ठरली होती. दिवाळीनिमित्त व्यापारीही मोठ्या संख्येने बाजारात आले होते. मुंबई-पुणे या ठिकाणी राहण्यासाठी असणारी गावची मंडळी दिवाळीनिमित्त गावी आल्याने बाजारांमध्ये त्यांचीही मोठीच गर्दी दिसत होती. आकाशदिवे, रांगोळी, कपडे, रुमाल सुपारी, फटाके, भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.
यावर्षी उशिरा का होईना पावसाने बळीराजावर कृपा केल्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण असल्याने दिवाळीचा बाजार मागच्या महिन्यात मोठा भरला होता. तर या आठवड्यात बाजारात गर्दी नसली तरी गेल्या महिन्यातील बाजारात मोठी गर्दी होती. भाजी बाजार वगळता बाजारात अत्यल्प खरेदी झाली.
दिवाळीनंतर नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद
दिवाळीचा बाजार चांगला झाल्याने आज बाजारात कमी ग्राहक दिसत होते; मात्र मागील महिन्यात दिवाळीच्या बाजारांमध्ये या वर्षाची उच्चांकी गर्दी दिसत होती. दिवाळीचा बाजार असल्यामुळे ग्राहकांची विविध वस्तूंची मागणी करीत होते. भाजी बाजारापेक्षा भेटवस्तू, मिठाई व कपडे खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त होता. ग्राहकांनी दिवाळीची खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याने आज ग्राहकांची संख्या कमी होती.
– महेंद्र बांगर, व्यावसायिक