लॉकडाऊनमुळे अभिनेत्री श्रिया सरन सध्या आपल्या पतीसोबत परदेशात आहे. आगामी काळात ती एस. एस. राजामौलीच्या आरआरआर चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटातील आपली भूमिकेबाबत माहिती दिली होती.
श्रियाने सांगितले की, या चित्रपटात ती अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्यांची फ्लॅश बॅक स्टोरी दाखविण्यात येणार आहे. यात अनेक फील्डगुड सीन्स आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लवकरच मायदेशी परतणार आहे. दरम्यान, अजय आणि श्रिया हे दुस-यांदा एकत्रीत काम करणार आहेत. यापूर्वी हे दोघे “दृश्यम’मध्ये एकत्र दिसले होते.
यावेळी श्रियाने प्रभासविषयी आपले मत व्यक्त केले होते. ती म्हणाली, प्रभास एक उत्तम अभिनेता आहे. तो नेहमीच छान दिसतो. मला त्याचे डोळे खूप आवडतात. तसेच एनटीआरबद्दल श्रिया म्हणाली की त्याच्याबरोबर काम करायला मजा येते. विशेष म्हणजे “आरआरआर’मध्ये अजय देवगनसह बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.