सांस्कृतिक क्षेत्रातील चर्चा; नव्या माध्यमांचा वापर गरजेचा ठरणार
पुणे – सांस्कृतिक राजधानी पुण्यात विविध कार्यक्रम सातत्याने होतात. या कार्यक्रमांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असतो. मात्र, येत्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि सांस्कृतिक क्षेत्राला मिळणारे प्राधान्य पाहता हा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता रसिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
आगामी काळात निर्माते, सादरकर्ते, लेखक आदींना “ऑनलाइन’चा देखील स्वीकारणे आवश्यक ठरणार आहे. लहान पुस्तक प्रदर्शने, ऑडिओ बुक्स, ऑनलाईन कार्यक्रमांचे सादरीकरण, ई-महोत्सव आदींचे आयोजन करावे लागणार आहे.
‘ई-बुक’…
पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता “ई-बुक्स’च्या पर्यायाकडे सकारात्मकतेने पाहावे लागणार आहे. छापील पुस्तकांसह “ई-बुक्स’वाचणाऱ्या वर्गाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लेखक, प्रकाशनांना या वर्गाचा विचार करावा लागणार आहे.
करोनाच्या संकटाचा परिणाम
सांस्कृतिक क्षेत्रावरही झाला आहे. या संकटातून माणूस उभा राहणे महत्त्वाचे आहे. समाजाची बदललेली मानसिकता आणि प्राधान्यक्रम यांचा संवेदनशीलतेने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.
– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र सा. परिषद