Shrikant Shinde On Holi : आज देशभर धूलिवंदन मोठ्या आनंदात साजर होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील रंगांची उधळण करून धुळवड साजरी केली जात आहे. अशात खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण केली. यावेळी त्यांनी भगव्या रंगांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले,”आज सगळेजण वेगवेगळ्या रंगात रंगले आहेत. एका रंगात भारत रंगला आहे तो म्हणजे भगवा रंग. भगव्या रंगात लोक रंगून गेले आहेत. धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा.” | Shrikant Shinde On Holi
उद्धव ठाकरेंचं नाव न घेता श्रीकांत शिंदे म्हणाले,”काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे. ज्यांनी भगवा रंग सोडून जो रंग धारण केला आहे तो त्यांना लखलाभ” तसेच आनंद दिघेंनी ठाण्यात सुरु केलेल्या या होळीला मुख्यमंत्री शिंदे देखील येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. | Shrikant Shinde On Holi
रुसवे-फुगवे बाजूला ठेवण्याचा आजचा दिवस. एकमेकांबरोबर होळी चांगल्या प्रकारे खेळली पाहिजे. विरोधक सत्ताधारीही या दिवशी एकत्र येतात. कटुता दूर करणारा हा सण असलयाचे देखील शिंदे यावेळी म्हणाले. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत. असंही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. | Shrikant Shinde On Holi