Swatantra Veer Savarkar Movie – 22 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित रणदीप हुड्डाचा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळपास सहा कोटींची कमाई केली आहे. सध्या सगळीकडे या सिनेमाची चर्चा सुरू आहे. (Swatantra Veer Savarkar Box Office Collection Day 3)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा बायोपिक –
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा बहुचर्चित चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 2.60 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाने 5.90 कोटींचा गल्ला जमवला आहे.
– पहिला दिवस : 1.5 कोटी
– दुसरा दिवस : 2.25 कोटी
– तिसरा दिवस : 2.60 कोटी
– एकूण कमाई : 5.90 कोटी
चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने घटवले 32 किलो वजन –
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली. या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत त्याने दिग्दर्शनेखील केलंय. दिग्दर्शक म्हणून रणदीपचा हा पहिलाच चित्रपट आहे. रणदीपने या सिनेमात स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 32 किलो वजन घटवलं आहे. एका मुलाखतीत रणदीपने याबाबतचा खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची निर्मिती 20 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लीजेंड स्टुडिओज यांनी केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहेत. अंकिताने या सिनेमात सावरकरांची पत्नी यमुनाबाईंची भूमिका केली आहे. तसेच अमित सियालदेखील या सिनेमाचा भाग आहेत.