सोरतापवाडी, (वार्ताहर) – श्रीदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी वडकी गावचे उद्योजक संदीप केरबा मोडक यांची सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत बिनविरोध निवड झाली.
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 31 मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षाची 96 टक्के वसुली झाली असून पारदर्शक कारभारामुळे संस्था थोड्या कालावधीत नावारूपाला आली आहे. यामुळे सर्व कर्जदार, ठेवीदार व सभासद व संचालक मंडळाचे आभार पतसंस्थेचे चेअरमन सूरज भालचंद्र चौधरी यांनी मानले.
पेठगावचे पोलीस पाटील व संस्थेचे सल्लागार दत्तात्रय चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन मारुती बरकडे, संचालक सचिव अॅड. नवनाथ गाढवे, संचालक धनंजय चौधरी, अण्णासाहेब कोतवाल, बाळासाहेब वाघमारे, संचालिका विजया शरद चौधरी, संचालिका रेखाताई लक्ष्मण चौधरी, उद्योजक राजेंद्र आढाव, राजेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मारणे, व्यवस्थापक तुषार कुंजीर, कामगार व सभासद उपस्थित होते.