नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २६ वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. दरम्यान, अश्यातच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं आहे.
आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात असताना त्याच्यावर चक्क दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकारामुळे यावेळी एकच खळबळ उडायचं दिसून आलं.
दरम्यान, यावेळी तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. मात्र, पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली. आणि हा हल्ला रोखला.
दरम्यान, आफताबवर हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे. यापुर्वी देखील हिंदू सेने कडून या प्रकरणी अनेक आंदोलने करण्यात आली होती. तेव्हा देखील अशी खळबळ उडाल्याचे दिसून आलं होत.
काय आहे नेमकं प्रकरण…!
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.