जळोची -चोपडज (ता. बारामती) येथील सरपंच पुष्पलता बाळासाहेब जगताप यांच्या घरी दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत 9 लाख 92 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, 85 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण पावणे अकरा लाखांचा ऐवज पळवून नेला.
सोमवारी (दि. 28) मध्यरात्रीदोनच्या सुमारास ही घटना घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी 20 ते 30 वयोगटातील दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुष्पलता जगताप यांनी फिर्याद दिली.
चोरट्यांनी घरामागील सेफ्टी दरवाजाची कडी आतील बाजूने काढून घरात प्रवेश केला. बेडरुममध्ये प्रवेश करत एका चोरट्याने फिर्यादीचे तोंड हाताने दाबून धरत चाकूचा धाक दाखवला. तुम चुप रहो, आपके पास जो है वह दे दो, असे त्याने सांगितले.
दुसऱ्या दुसऱ्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने कटरने कापून घेतले. तसेच हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या.
त्यानंतर चोरट्यांनी बेडरुममधील कपाटातून हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.