…या कारणामुळे ‘श्रद्धा कपूर’ने बदलले इंस्टाग्रामरील नाव

बॉलीवूडमध्ये श्रद्धा कपूरने एकापेक्षा एक सरस चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपला एक स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार केला आहे. या चाहतांशी थेट संपर्क साधण्यासाठी सध्या बॉलीवूडमधील स्टारकास्ट सोशल मीडियाला सर्वाधिक पसंती देत आहे. सोशल मीडियावर ते आपल्या खासगी फीलिंग्स एक्‍सप्रेस करत असतात. यात श्रद्धा कपूरही मागे नाही.

श्रद्धाने आपल्या इंस्टाग्रामवरील नावात बदल केला असून तिने “आरोही’ असे नवीन नाव दिले आहे. या मागे एक विशेष कारण असल्याचे समजते. त्याचे झाले असे की, ‘आशिकी 2′ चित्रपटाने (26 एप्रिल) नुकतेच सहा वर्ष पूर्ण केले आहेत. हा चित्रपट श्रद्धासाठी खूपच स्पेशल आहे. या चित्रपटात तिचे नाव “आरोही’ असे होते आणि ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूर सध्या आपल्या आगामी साहो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास झळकणार आहे. याशिवाय श्रद्धाने “स्ट्रीट डांसर’चा लंडनमधील शेड्यूल पूर्ण केले असून लवकरच त्याचे पुढील शेड्यूलची तयारी सुरू करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.