Showtime Web Series| अभिनेता इमारान हाश्मीची ‘शो टाईम’ ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सिरिजमध्ये मराठमोळा अभिनेता शशांक केतकर देखील झळकला आहे. या सिरिजमधील शशांकच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेबसिरिज व्यतिरिक्त शंशाकने यापूर्वी देखील हिंदी वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
‘शो टाईम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया यातून दाखवण्यात आली आहे. निर्माता करण जोहरने ओटीटीवर ‘शो टाइम’ या वेब सीरिजद्वारे हे सत्य समोर आणले आहे. यात शशांक केतकरची भूमिका ही नक्कीच वेगळी असणार आहे. शो टाईममध्ये अनेक बॉलिवूड कलाकार असून शशांक केतकर या मोठ्या कलाकारांसोबत झळकणार आहे. इमरान हाश्मी, मौनी रॉयसह अनेक बॉलिवूड कलाकार शो टाईममध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शशांक केतकरने करण जोहरचं प्रोडक्शन असलेल्या वेब सीारिजमध्ये झळकणार असल्याची माहिती दिली होती. . शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत एक खास पोस्ट शेअर केली होती. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन करण जोहरच्या ऑफिसमधील व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओला त्याने “शो टाइम! 8 मार्चपासून फक्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर. जेव्हा तुम्ही धर्माच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी जाता तेव्हा कुछ कुछ होता है! काम छोटसं आहे, पण आठवणीत राहणारं आहे,” असं कॅप्शन दिले होते. त्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता.
शशांकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो याआधी शशांक ‘स्कॅम 2003’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा:
गुजरातच्या मोरबीमध्ये भीषण दुर्घटना ; निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, पहा व्हिडिओ