- उद्या 60 केंद्रांवर कोव्हॅक्सिन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेकडील कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे आज फक्त कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. मात्र, यावेळी कोव्हॅक्सिन लसीच्या केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शहरातील तब्बल 60 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि. 10) शहरातील 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना 34 लसीकऱण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे. तर 26 केंद्रांवर 45 वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 250 लाभार्थ्यांना लस देण्याची क्षमता आहे. त्यामध्ये पहिला डोस 10 लाभार्थी कोविन ऍपद्वारे ऑनलाईन स्लॉट बुकींग केलेल्या व 140 लाभार्थी किऑस्क टोकन पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. तसेच दुसरा डोस 5 लाभार्थी कोविन ऍपवरील व 95 किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.
सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी मंगळवारी (दि. 10) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.