पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांसाठी शासनाकडून कोणताही निधी देण्यात आलेला नाही. तसेच, या गावांचा वर्षानुवर्षे विकास खुंटला आहे. मात्र, ही गावे महापालिकेत सामाविष्ट झाली असून या गावांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटीबध्द असून या गावात पायाभूत सुविधा देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही महापालिकेचे माजी सभागृहनेत श्रीनाथ भिमाले यांनी दिली. भाजपक़डून भिमाले यांच्यावर उंड्री गावाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, भिमाले यांनी या गावाची नुकतीच पाहणी करून गावातील समस्या जाणून घेतल्या. तसेच उंड्री गावासाठी महापालिकेच्या माध्यमातून तातडीनं 1 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार योगेश टिळेकर, योगगुरू दीपक शिळीमकर, दादा कड, अक्षय टकले, जयश्री पुणेकर,भाजप डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ तेजस्विनी अरविंद,प्रकाश होले,विजय चौधरी,कैलास पुणेकर,अनिल होले,दत्तोबा होले यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकारी, राजेंद्र भिंताडे,अविनाश टकले,दादा कड,ओंकार होले,हनुमंत घुले यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत ,कोव्हिडं योद्धा सन्मान,मनपा कर्मचारी,माजी सैनिक,निवृत्त पोलीस सन्मान, रिक्षाचालकाना सीएनजी कुपन वाटप,जेष्ठ ग्रामस्थ,10 वि 12 वि उत्तीर्ण विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार,गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले. श्रीकांत भिंताडे,सचिन भिंताडे,तुषार भिंताडे, भानुदास होले,विठ्ठल भिंताडे,निलेश भिंताडे,संकेत भिंताडे,अरुण आंबेकर, प्रकाश आबनावे, काशिनाथ कड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.