– अमोल कचरे
पिफच्या सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी डेलिगेट्सना विविध शॉर्ट फिल्म्सची अनोखी अशी मेजवानी मिळणार आहे. 10 ते 20 मिनिटांच्या लघुपटात एक कथा सांगणे हे तसं अवघड काम. पण काही दिग्दर्शक हे आव्हान स्वीकारतात आणि काही प्रेक्षकांना मोठ्या लांबीच्या फिल्मपेक्षा छोटे-छोटे लघुपट आवडतात. ब्रिटिश ऍकेडमी फिल्म ऍवॉर्ड म्हणजेच बाफ्तामधील 8 शॉर्ट फिल्म्स, ट्रायबल रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमधील 15 फिल्म्स अशा तब्बल 22 शॉर्ट फिल्म्स मंगळवारी सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआर पॅव्हेलियन येथे दाखवण्यात येणार आहेत. त्याविषयी…
बाफ्ता शॉर्टस
यावर्षी पिफमध्ये कंट्री फोकस (देश विभाग) या विभागांत युनायटेड किंगडम (युके)मधील चित्रपट, लघुपट दाखवण्यात येणार आहेत. याकरिता ब्रिटिश कौन्सिलचे विशेष सहकार्य मिळाले आहे. बाफ्ता शॉर्टस या विभागात जे लघुपट दाखवले जाणार आहेत, ब्रिटिश समाजामधील विविधता दर्शविणाऱ्या कथा यामध्ये दाखवल्या जाणार आहेत. शिवाय, युकेमधील उत्कृष्ट अभिनय कौशल्य पाहण्याची संधी पिफच्या डेलिगेट्स ना मिळणार आहे. या अंतर्गत मंगळवारी पीव्हीआर पॅव्हेलियन येथे ऑडी 6 मध्ये सकाळी 10.30 वाजता पुढील 8 शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. वेल (वेळ : 20 मिनिटे), 73 काऊज (15 मिनिटे), आय एम ओके (6 मिनिटे), बॅचलर, 38 (16 मिनिटे), मारफा (9 मिनिटे), रफहाऊस (16 मिनिटे), द ब्लू डोअर (19 मिनिटे) आणि द फिल्ड (19 मिनिटे) या 8 शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
ट्रायबल रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटीशन
आदिवासी समाजातील विविध प्रथा, विशेष वस्तू आणि त्यांची संस्कृती सांगणारे 15 लघुपट ट्रायबल रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटीशन यामध्ये मंगळवारी दाखवण्यात येणार आहेत. पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडी 5 मध्ये दुपारी 3 वाजता हे लघुपट दाखवले जाणार आहेत. आर्ट फॉर लाईफ (दिग्दर्शक – सायली तनपुरे), भांगसार-थाळ (राहुल पवार), चंकी सोकडा (धर्मा वानखेडे), मूळ-द रूट्स (सुयोग देशपांडे), नंदी बैल (राहुल पवार), पडकई -टुगेदरनेस (अमर मेलगिरी), रानी बेटी (धर्मा वानखेडे), सोयरीक (बंडूराव जाधव), तारपा-ऑर्गन्स ऑफ इनोसंट कल्चर (मनोज जानवेकर), थाळ काठी (विवेक कुलकर्णी), थाळी वाद्य (पवन ढावरे), थलसर बांगसर (आर. एम. जाधव), द माईटी गोंड्स ब्रिक्स ऑफ चंदीगड (विप्लव शिंदे), वनोपचार आदिवासांचा (प्रशांत कढे), तारपा (विशाल बर्डे). या लघुपटांमधील कोणत्या लघुपटाला पारितोषिक मिळणार याची चर्चा डेलिगेट्समध्ये आहे.