आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

वसतिगृहातील समस्यांबाबत घोडेगाव येथे स्टुडंट्‌स फेडरेशनचे आंदोलन
मंचर (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयावर स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे जिल्हा समितीच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहातील विविध समस्याबाबत नुकतेच आंदोलन करण्यात आले.

घोडेगाव येथील हरिश्‍चंद्र मंदिरापासून ते प्रकल्प कार्यालय, घोडेगाव पर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रकल्प कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.आंदोलनात एसएफआय राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे जिल्हा सचिव विलास साबळे, अध्यक्ष राजू शेळके, रोहिणी नवले, संदीप मरभळ, रवी साबळे, अविनाश गवारी, रोहिदास गभाले, समीर गारे, रुपाली खमसे, तृप्ती दुरगुडे, प्रवीण गवारी, अक्षय घोडे, अक्षय निर्मळ, रामदास जोशी, अक्षय साबळे, बाबूराव जोशी, अजित बुळे, पौर्णिमा उगले, नेहा भवारी, अनिकेत केंगले, सचिन साबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय किसान सभेचे राजू घोडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी झालेल्या विविध वसतिगृहाचे प्रतिनिधी व एसएफआयचे कार्यकर्ते असे तेरा जणांच्या शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व मागण्या मान्य करत समस्या सोडवण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.