छत्तीसगड – छत्तीसगडच्या गौरेला भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक तरुणी थेट 80 फूट उंच विजेच्या टॉवरवर चढलेली दिसते. मात्र तिने असे करण्यामागचे कारण वाचून तुम्हीही अचंबित होताल. प्रियकराशी भांडण झाल्याने रागाच्या भरात ही तरुणी विजेच्या टॉवरवर चढल्याचे सांगितले जात आहे.
या प्रियसीचे फोनवर बोलत असताना प्रियकरासोबत काही कारणावरून भांडण झाले होते. मात्र त्याचा जास्त राग आल्याने या तरुणीने थेट टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. इतकेच काय तर प्रियकर देखील प्रेयसीच्या मागे तिची समजूत काढण्यासाठी टॉवरवर चढला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुळात हे भांडण इतके विकोपाला जाईल याची कल्पनाही प्रियकराला नव्हती. हा संपूर्ण प्रकार घडत असताना गावकरी देखील चिंता व्यक्त करत असल्याचे व्हिडिओतून ऐकू येत आहे.
*Upset with lover, Girlfriend Climbs high Tension tower, then lover also climbs*
This is the first time I have seen someone climb them to commit suicide upset with her lover. Good news, the boyfriend followed her up and convinced her to climb down. All iz well Chhattisgarh today pic.twitter.com/oPqiK0EMpl
— keshaboina sridhar (@keshaboinasri) August 6, 2023
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत हा तरुणही प्रेयसीमागे टॉवरच्या सर्वात वरच्या टोकापर्यंत पोहोचला होता. पोलिस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी या दोघांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र बराच वेळ समजूत काढल्यानंतर दोघांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही असे पुन्हा न करण्याबाबत दम भरला.