धक्कादायक : रेमडेसिविरच्या नावाखाली विकले पाणी !

बीड : बीडमध्ये मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी 3 आरोपींना रंगेहात रेमडेसिविर विकताना पकडले होते. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे रेमडेसिविरच्या बॉटल्समध्ये सलाइनचे पाणी टाकून विकले गेले आहे. हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा आहे. परिणामी या इंजेक्‍शनचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले. घटनेतील आरोपी कम्पाउंडर असून, त्याने रुग्णालयातील इंजेक्‍शनच्या बाटल्यात सलाइनचे पाणी टाकून हे इंजेक्‍शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.