बंगळुरू : उबेर कंपनीने आपल्या सुमारे दीड लाख चालकांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी त्यांनी सुमारे साडेअठरा कोटी रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले आहे.
यासाठी त्यांनी चालकाला प्रत्येकी 400 रुपयांचे 2 डोस देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणाचे सर्टिफिकेट चालकांनी त्यांच्या गाड्यांवर लावणेही अत्यावश्यक केले आहे. आम्ही याविषयी आमच्या चालकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करणार असून, त्याद्वारे त्यांना कंपनीच्या या ऑफरचा लाभ घ्यावा, अशी सूचना केली जाईल, असे कंपनीचे दक्षिण अशिया विभाग प्रमुख पवन वैश्य यांनी सांगितले.
उबेरच्या चालकांना सरकारी माध्यमातून मोफत लस मिळण्यास विलंब होऊ शकतो म्हणून कंपनीने स्वतःहून आपल्या योजनेतील चालकांना हे मोफत डोस देण्याचे योजले आहे, असे सांगण्यात येते.