धक्कादायक ! अल्पवयीन मुलीसह तरुणाने शेतात घेतला गळफास

शिवना – मागील काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढलं आहे. त्यातही प्रेमीयुगुलांच्या आत्महत्यांच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत. त्यातच औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे एका अल्पवयीन मुलीसह तरुणाने शेतात गळफास घेतला.

16 वर्षीय मुलीने 20 वर्षीय तरुणासोबत एकाच झाडावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

जळकी बाजार येथे आस्तिककुमार दांडगे आणि कैलास दांडगे यांच शेत आहे. याच शेतात, सोमवारी सकाळी अस्तिककुमार यांचा मुलगा शरद आणि कैलास दांडगे यांच्या अल्पवयीन मुलीने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

दरम्यान अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.