Asaram Bapu। राजस्थानच्या जोधपूरच्या तुरुंगात लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली स्वयंघोषित बाबा आसाराम बापू कैद आहेत. दरम्यन त्याने काही दिवसापूर्वी न्यायालयाकडे आयुर्वेदिक उपचारासाठी मागणी केली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने याबाबत रुग्णालयाचा अहवाल मागवला आहे. आसाराम यांनी महाराष्ट्रातील पुण्यातील माधवबाग रुग्णालयात आयुर्वेद उपचारांच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती.
रुग्णालयाचा तपशील द्या Asaram Bapu।
आसारामच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विनीत माथूर आणि दिनेश मेहता यांच्या खंडपीठाने पुण्यातील रुग्णालयाचा तपशील मागवला आहे. रुग्णालयात कोणते उपचार केले जातील आणि किती दिवस लागतील? अशी विचारणा देखील न्यायालयाने केलीय. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 मार्च रोजी होणार आहे. याआधी आसारामच्या वकिलाला कोर्टात हॉस्पिटलची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने सरकारी वकिलाला जोधपूर आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडून आसारामच्या पुणे दौऱ्याची आणि तेथे तैनात असलेल्या पोलिसांच्या तैनातीबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपशील न्यायालयाला द्या. आसारामला जोधपूर कोर्टाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आहे. 2018 मध्ये आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आसारामला गुजरात हायकोर्टाने दिला दिलासा Asaram Bapu।
गुजरात हायकोर्टाने बलात्काराचा दोषी आसारामला दिलासा दिला आहे. 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात आसारामच्या शिक्षेविरुद्धच्या अपीलवर त्याचे वाढलेले वय लक्षात घेऊन सुनावणी होणार आहे. जवळपास एक दशक ते तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत 4 एप्रिलपासून त्यांच्या अपीलवर सुनावणी सुरू करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
बलात्काराच्या एका खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला होता. आसाराम यांची प्रकृती खालावल्याने शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.