मुंबई : अस्थिरतेचं दुसरं नाव क्रिप्टोकरन्सी असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. त्यामुळे भारत सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. मात्र तिकडे एका क्रिप्टोकरन्सीने अवघ्या दोन तासांत लाखो रुपयांचे रिटरन्स दिले.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केलेला गुंतवणूकदार रातोरात एकदम श्रीमंत बनू शकतो किंवा अगदी एकाच रात्रीत भिकारीही बनू शकतो. मात्र एका नवीन क्रिप्टोकरन्सीनं सोमवारी प्रचंड परतावा देत अनेकांना रातोरात कोट्यधीश बनवलं.
शिह त्सु (Shih Tzu) असं त्या करन्सीचं नाव आहे. एका चिनी जातीच्या श्वानावरून या करन्सीचं नाव ठेवण्यात आलं आहे. दोन तासांमध्ये Shih Tzu मध्ये प्रचंड उसळी बघायला मिळाली.
Shih Tzu या क्रिप्टोकरन्सीमध्ये सोमवारी जवळपास दोन तासांत 6,00,000 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. Shih Tzu काही वेळातच 0.000000009105 डॉलरवरून 0.00005477 डॉलरपर्यंत पोहोचलं, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे एक हजार रुपयांचे दोन तासांत साठ लाख रुपये झाले. एक्स्चेंजमध्ये या डिजिटल टोकनचा व्हॉल्यूमही 65 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.