नवी दिल्ली – भाजपच्या महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण उत्तरप्रदेशात खळबळ माजली. सविता गौतम असे या महिलेचे नाव असून ती ४५ वर्षांची होती.
आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह शनिवारी सायंकाळी घराजवळील झोपडीत बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आपल्या पतीशी झालेल्या भांडणातून त्यांनी आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. झोपडीत एक चिठ्ठी सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेची यूपीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मृतदेहासोबत सापडलेल्या चिट्ठीत ‘माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही’ असे लिहिले असल्याचे देखील समोर आले आहे. भाजप भदोही जिल्हा युनिटचे प्रवक्ते गोवर्धन राय यांनी याबाबत माहिती देताना, सविता गौतम या जिल्ह्यातील पक्षाच्या महिला शाखेच्या पदाधिकारी असल्याचे सांगितले.