धक्कादायक : गर्भवतीच्या अल्पोपहारात आळ्या

पालिका रुग्णालयातील प्रकार

पुणे : महापालिकेच्या भवानी पेठ येथील सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवती महिलांना सकाळी देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळया निघाल्या. मागील आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून या घटने नंतर अनेक महिलांनी या जेवणावर बहिष्कार घातला. तसेच काही महिलांना उलटी तसेच इतरही त्रास झाला.

महापालिकेकडून या रुग्णालयात करोना बाधित गर्भवती महिला तसेच करोना संशयित गर्भवतींना उपचार दिले जातात. या महिलांना दोन वेळेस नाष्टा तसेच जेवण दिले जातात. शनिवारी सकाळी या महिलांना देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळया निघाल्या, त्यांना काही महिलांनी रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यानंतर, जास्त काही नाही तुम्हाला दुसरा नाष्टा देतो असे सांगत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही गर्भवती महिलांनी वारंवार हा प्रकार घडत असून यामुळे आम्हाला त्रास होतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक महिलांनी या अल्पोपहारावर बहिष्कार टाकला. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेकडून रुग्णाना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच गर्भवती महिलाबाबत असा निष्काळजी पणा केल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.