मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने तिच्या स्टँडअपमध्ये महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. केतकीने यावेळी शेअर केलेला पोस्टमुळे सोशल मीडिया आता वादंग निर्माण झाला आहे.
केतकीने केलेल्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सने आक्षेप घेतला होता. केतकीच्या याच वक्तव्यावरुन सोशल मीडिया युजर्स आक्रमक झाले आहे. सोशल मीडियावर सध्या या वादावरून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.