राजगुरुनगर – कनेरसर (ता. खेड) येथे मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर घडकीस आल्याने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गावातील एका तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश उर्फ पिंट्या दौंडकर (रा. कनेरसर, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कनेरसर येथील पीडिता सहा महिन्यांपूर्वी घरात एकटी असताना घराशेजारी राहणारा महेश दोंडकर याने घरी व आजुबाजुला कोणी नसल्याचा फायदा घेत मंतिमंद मुलीवर बलात्कार केला. तर याबाबत कोणाला काही सांगितले तर मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, काही दिवसांनी पीडिता आजारी झाल्याने आई-वडिलांनी तिला उपचारासाठी खासगी दवाखन्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आई-वडिलांनी तिला मोशी येथील चैतन्य महिला संस्था येथे दाखल केले होते. या घटनेबाबत चैतन्य महिला संस्थेन खेड पोलिसांना माहिती दिली होती.
घटनेचा पुढील तपास खेड उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे निरीक्षक सतीश गुरुव, सहायक निरीक्षक निलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलीस हवालदार सुरेखा भोर करीत आहेत.