नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. राकेश टिकैत हे कर्नाटकात पत्रकार परिषदेत बोलत असताना एका व्यक्तीने त्यांच्याजवळ जाऊन राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली.
शाई फेकल्यानंतर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना राकेश टिकैत यांनी हे सरकारचे षडयंत्र असल्याचे म्हटले.
Bengaluru | No security has been provided by local police here. This has been done in collusion with the government: Bhartiya Kisan Union leader Rakesh Tikait on ink attack on him pic.twitter.com/P5Jwcontc7
— ANI (@ANI) May 30, 2022
“येथे स्थानिक पोलिसांनी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. हे सरकारच्या संगनमताने झाले आहे. सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर आहे.” असा आरोप यावळे राकेश टिकैत यांनी केला.