धक्कादायक ! पती-पत्नीची आत्महत्या; पत्नीने घरी तर पतीने कार्यालयात घेतला गळफास; नुकतचं झालं होत लग्न

जामखेड – पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. शिल्पा अजय जाधव (वय २८) हिने दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिचा पती अजय कचरदास जाधव (वय ३२) त्याने देखील दुसर्‍या ठिकाणी काही वेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी एकच दिवशी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, की अजय व शिल्पा या दोघांचा नुकताच चार महिन्यापूर्वी मोठ्या थाटात विवाह सोहळा संपन्न झाला होता. आज दुपारी शिल्पा जाधव हिने बीड रोड जवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती तिचा पती अजय जाधव यास माहित झाली. या नंतर त्याने देखील मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या जारप्लांटमधील ऑफीस मध्ये काही वेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती-पत्नी यांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप काही समजू शकले नाही. अजय याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले की माझ्या आत्महत्यास मी जबाबदार असुन कोणासही दोषी ठरवू नये. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.

या प्रकरणी मयताचा भाऊ अभिषेक कच्चरदास जाधव याने जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अजय याचा मोठा मित्रपरिवार होता. मात्र दोघा पती पत्नीच्या आत्महत्याने मित्रपरिवारांनमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.