Video | पुणे मनपाच्या जम्बो कोविड सेंटरमधील रूग्णांचे चोचले; गुटखा, तंबाखू, सिगारेटचा रूग्णांना पुरवठा…

पुणे( प्रतिनिधी) :  महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटर रूग्णालयातील रूग्णांचे चोचले नातेवाईक आणि मित्रांकडून गुपचूप पुरविले जात आहेत. त्यासाठी तस्करांप्रमाणे या रूग्णांना तंबाखू, सिगारेट्‌, दारू तसेच गुटखा पुरविला जात आहे.

विशेष म्हणजे त्यासाठी रूग्णांना घरून जेवण देण्याच्या नावाखाली अट्टाहास धरला जात असून महापालिकेचे जेवण वेळेत मिळत नसल्याच्या आणि जेवण निकृष्ट असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

याशिवाय, जम्बो कोविड सेंटरमध्ये महापालिकेकडून मासांहारी जेवण देण्यास बंदी असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांकडून जेवणाच्या डब्यात गुपचूप हे साहित्य पुरविले जात आहे. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहेत.

शिवाय, संबधित रूग्णांच्या उपचारावरही त्याचे गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी दारू पुरविणारा हाऊस किपर निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.