जामखेड : जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घालते असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 2 पर्यंत झालेल्या 75 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत जामखेड शहरासह तालुक्यातील १३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
दरम्यान जामखेड पंचायत समितीत कोरोनाने शिरकाव केला असून यामध्ये एक जण कोरोनाबाधित आढळून आले त्यामुळे पंचायत समितीमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यात कोरोनाबाधिताची संख्या 139 वर गेली असून जामखेड शहरात दि 8 पासून ते दि 12 पर्यंत जनता कर्फ्यू सुरु आहे. दि 29 पासून जामखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शहरासह ग्रामीण भागात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आज दुपारी 2 पर्यंत केलेल्या 75 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 13 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील गोडाऊन गल्ली 1, खाडे नगर 1, म्हेत्रे वस्ती 1, पोकळे वस्ती 6, राळेभात गल्ली 1, पंचायत समिती 1 , मोहा 1, पिंपळगाव आवळा1 असे एकूण 13 कोरोनाबाधित आढळून आले. पंचायत समितीतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने 8 दिवस पंचायत समिती बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.