लंडन – क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेटमध्ये सराव करताना इंग्लंजच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. जोशुआ डाऊनी असं या क्रिकेटपटूच नाव आहे. जॉशुआच्या अकाली निधनामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
नेटमध्ये सराव करत असताना जडोशुआ अचानक अडखळला आणि खाली कोसळला. त्यानंतर त्याला सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल केलं. मात्र तो परत शुद्धीवर आलाच नाही. नॉटिंगहॅमशायर क्रिकेट बोर्ड प्रीमियर लीगने निवेदनात म्हटले आहे की, “24वर्षाच्या जोशुआ डाउनीच्या निधनाची बातमी ऐकून एनपीएलमधील प्रत्येकजण धक्क्यात आहे. या कठीण काळात आम्ही जॉशच्या कुटुंबीयांसोबत आहोत. जोशुआच्या घरच्यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूला हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना या आधी भारताततही अनेकदा घडल्या आहेत. त्यापैकी काहींचा जीव वाचवण्यात यश आलं, पण काहींनी मैदानावरच प्राण सोडला होता.