सातारा -शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत अजित निकम हे मित्रासोबत दि. 18 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 च्या सुमारास बसले असता, मोटारसायकलवरून आलेल्या सहा तरुणांनी निकम यांना कोयत्याच्या लाकडी मुठीने आणि त्यांच्या मित्राला हाताने मारहाण करून त्यांच्याकडून दोन मोबाइल, एक मनगटी घड्याळ व एक लाख 62 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. हा दरोडा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, साहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी सचिन गब्बर भोसले (रा. मालगाव, ता. सातारा, सध्या रा. इब्राहिमपूर, ता. कोरेगाव), हरिष पिताजी उर्फ मुतखड्या शिंदे (वय 26) व गणेश शिवाजी कोकरे (दोघे रा. पणदरे-म्हसोबावाडी, ता.बारामती), शेखर बाळू चव्हाण (रा. साखरवाडी, ता. फलटण), माकशा रंगा काळे (रा. सुरुर, ता. वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत बन्सल यांनी दिलेली माहिती अशी, या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका व स्थानिक गुन्हे शाखा करत होती. यादरम्यान मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थागुशाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके, साहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतिलाल नवघणे, विश्वनाथ सपकाळ, आतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, प्रवीण कांबळे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमोल माने, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, प्रवीण पवार, विशाल पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, नितीन गोगावले, वैभव सावंत, केतन शिंदे, धीरज महाडिक यांनी ही कारवाई केली.