ओतूर -उदापूर (ता. जुन्नर) येथील प्राचीन महादेव मंदिर परिसरात शिवरात्रौत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती अडाणी-कबाडी मंडळाचे अध्यक्ष मोहन वलव्हणकर व सचिव भोर यांनी दिली. पहाटे मंडळाचे खजिनदार संतोष होनराव यांनी सपत्निक महादेवाचा अभिषेक केला. त्यानंतर मांडव डहाळे व शिव प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मांडव डहाळे बैलगाडीत सजवून आणले होते. भगवान शंकर व शिवरात्र कथा यावर आधारित हभप डॉ. प्रवीण आंबेकर (पारनेर) यांचे कीर्तन झाले. रात्री नऊ वाजता भैरवनाथ भजन मंडळ व माता माऊली भजन मंडळांनी हरिजागर केला. विकास होनराव व पंडित वैद्य यांनी मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक करून शिव मुखवटा चढविला. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे यांनी दर्शन घेतले.
मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत शिरसाठ, सहसचिव अवधूत बेदरे, दिलीप वलव्हणकर, किशोर होनराव, राजेंद्र शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य विनोद भोर, डॉ. पुष्पलता शिंदे, कविता भोर, वर्षा वलव्हणकर, प्रभा वाळेकर, शुभांगी होनराव, उज्ज्वला कोल्हे, अनिता कुलकर्णी, स्वाती वलव्हणकर, वैभव कुलकर्णी, साईनाथ भोर, विकास शिरसाठ, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बबन नि. कुलवडे, संजय ढमढेरे, मनोहर शिंदे, माजी उपसरपंच मनोज शिंदे, बन्सीधर कुलवडे, बबन अनाजी कुलवडे, भागूजी शिंदे, दीपक भोर, माजी सरपंच अनाथा बुगदे, सुधाकर आंबडेकर, रवींद्र आंबडेकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.