सोलापूर-पुणे महामार्गावर शिवशाहीला अपघात

दोन जण ठार : 14 जखमी

सोलापूर (प्रतिनिधी) – पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या शिवशाहीला शेटफळजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवासी ठार, तर चौदा जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

माजी सैनिक मल्लीकार्जुन सिद्रामप्पा अंबुसे (वय 72, रा. सोलापूर) आणि नितीन लक्ष्मण कांबळे (वय 25, रा. भुताष्टे, तालुका माढा) अशी मृतांची नावे आहेत. पुण्याहून सोलापूरकडे येणारी शिवशाही बस (एमएच-47-2050) ही शेटफळ हद्दीत आली असता चालकाचा ताबा सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला समोरा-समोर जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस पुढे जावून एका लिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात बसच्या समोरील बाजुचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)