शिवसैनिक म्हणाले, तान्हाजी सावंत खेकडा

सोलापूर : मंत्रिपद नाकारल्यामुळे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आहेत. त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत झालेल्या निवडणुकीत भाजपला हात दिला. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत.

सोलापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त करीत बॅनर झळकवले आहे. ‘हा खेकडा तर सोलापूर आणि धाराशिवची (उस्मानाबाद) शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,’ अशा आशयाचे बॅनर सोलापुरात झळकले आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौक परिसरात हा बॅनर लावला आहे.

तानाजी सावंत यांनी जिल्हापरिषदेत झालेल्या निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. सावंत यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.