Shivraj Singh Chouhan – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर, पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाकडे ( Chief Minister ) डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे येथे कोण मुख्यमंत्री होणार हा कळीचा प्रश्न बनला आहे.
मध्यप्रदेशातील विजयाचे श्रेय सगळ्यांनीच निर्वीवादपणे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना दिले असले तरी भाजप श्रेष्ठींकडून मात्र त्यांना अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
मध्यप्रदेशातील हा विजय मोदींचा नसून एकट्या शिवराजसिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan ) यांचा असल्याचे विष्लेषण केले जात आहे. त्यामुळेही पक्षात दबक्या आवाज शिवराजसिंह यांच्या निवडी विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
या संबंधात आपली प्रतिक्रीया नोंदवताना शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे की, आपण यापूर्वी कधीही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नव्हतो आणि आताही या पदासाठीचे दावेदार नाही असे ते म्हणाले. चौहान यांनी मंगळवारी एएनआयशी बोलताना ही टिप्पणी केली.
त्यांनी म्हटले आहे की, “मी मुख्यमंत्रीपदाचा कधीच दावेदार नव्हतो आणि आजही नाही. एक कार्यकर्ता या नात्याने पक्ष जे काही काम देईल ते मी माझ्या पूर्ण समर्पणाने, क्षमतेने आणि प्रामाणिकपणे करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत आणि मी त्यांच्यासोबत काम करताना मला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटतो.