मुंबई – चक्रीवादळ मिचॉन्गने तामिळनाडू (Cyclone Michong tamilnadu) आणि त्याच्या आसपासचे भाग पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चेन्नईत (Chennai Floods) सर्वत्र पाणीच पाणी आहे. यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागल्याचेही समजते.तमिळनाडूमध्ये शाळा आणि महाविद्यालयेही बंद (Tamilnadu school close) करण्यात आली आहेत.अशात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांसाठी साऊथस्टार सूर्या आणि कार्तीने मदतीचा हाथ पुढे केला आहे.
यावेळी चेन्नईतील अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. चेन्नई विमानतळही ४ नोव्हेंबरच्या रात्री बंद करण्यात आले होते. अशात शहर बुडत असल्याचे पाहून सुप्रसिद्ध अभिनेते सूर्या आणि कार्ती (Surya and karthi) मदतीसाठी पुढे आले आहेत. दोन्ही स्टार्सनी लोकांच्या मदतीसाठी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. (Surya help people))
सुर्या आणि कार्ती यांनी मदतकार्य आणि चेन्नईतील लोकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. स्टार्सनी 10 लाख रुपये दान केल्याचे वृत्त समोर आले आहे. हे पैसे कलाकारांच्या फॅन क्लबच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. व्यापार तज्ज्ञ मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘सूर्या आणि कार्ती यांनी चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लुवरच्या पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे. (Surya karthi help people)
Just IN: Actors #Suriya & #Karthi have announced an initial sum of ₹ 10 lacs to carry out relief work in the flood affected districts of Chennai, Kancheepuram, Chengalpattu and Tiruvallur.
||#ChennaiRains2023||#ChennaiFloods|#CycloneMichaung||The actors are offering… pic.twitter.com/CikZbk135c
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 4, 2023
यापूर्वीही मदत केली आहे मदत
या दोन्ही भावांनी मदतीचा हात पुढे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा पूरग्रस्तांना मदत केली आहे. 2018 मध्ये दोन्ही भावांनी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपये दिले होते.