वेल्हे -राजगड, तोरणागडावरून शिवज्योत मिरवणुका काढत वेल्ह्यात शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. शिवज्योत शिवश्री सुनील वेगरे, शुभम बोराणे, आकाश कोळपे, तानाजी वेगरे यांनी तोरणागडाच्या पायथ्याशी आणली. यावेळी शिवज्योतीचे औक्षण केले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे, ग्रामसेवक वेल्हे नितीन ढूके यांच्या हस्ते करण्यात आले. शिवभजन महादेव भोंडेकर, बबन पवार, दत्तात्रेय ओव्हाळ यांनी केले.
शकंतुला साबळे, द्वारका वालगुडे, देविका बोराणे, भारती गायकवाड यांनी शिवपाळणा गायला. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी बीडीओ विशाल शिंदे, सभापती दिनकर सरपाले, उपसभापती सीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, माजी सभापती संगीता जेधे, अध्यक्ष नाना राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती महोत्सवाचे तालुकाध्यक्ष संतोष खुळे, सचिव रविराज गायकवाड, सहसचिव सुनील साबळे, कोषाध्यक्ष गणेश देवगिरकर, सहकोषाध्यक्ष नाना शिंदे, सहकार्याध्यक्ष युवराज गायकवाड, उपाध्यक्ष सुनील वेगरे, राजू वेगरे, संतोष बोराणे यांनी केले.