Shivaji Satam : ‘सीआयडी’ फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 4 डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘सीआयडी’ या क्राईम थ्रिलर शोमधून ‘फ्रेड्रिक्स’ची या भूमिकेतून त्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र त्यांच्या ज्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच अभिनेते शिवाजी साटम यांनी दिनेश फडणीस यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
“दिनेश माझा सहकलाकार कमी आणि कुटुंबातला सदस्य जास्त होता. त्याचं हे अचानक जाणं खूप व्यथित करणारं आहे”, अशी प्रतिक्रिया शिवाजी साटम यांनी दिली होती. तर साधा, प्रेमळ आणि नम्र, अशा तीन शब्दात शिवाजी साटम यांनी पोस्ट केली आहे. सीआयडी मध्ये डॉ. साळुंखे यांची भूमिका करणारे नरेंद्र गुप्ता यांनी देखील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तुझी आठवण येईल मित्रा. तू जाण्याची घाई केलीस. देव तुला त्यांच्या चरणी स्थान देवो. ओम शांती. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.. तुझ्या आठवणींवर आम्ही जगू, असे नरेंद्र गुप्ता म्हणाले.
View this post on Instagram
‘सीआयडी’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते दिनेश फडणीस घराघरांत पोहोचले आहेत. दिनेश यांनी 1993 मध्ये ‘फासले’ या शोच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचबरोबर ‘सरफरोश’ आणि ‘सुपर 30’ या सिनेमात देखील त्यांनी काम केलं. तारक मेहता का उल्टा चष्मा , सीआयडी : विशेष ब्यूरो, अदालत, सीआयएफ या मालिकेत देखील त्यांनी काम केलं आहे.
दिनेश फडणीस हे लिव्हर डॅमेजच्या समस्येनं त्रस्त होते. दिनेश यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.