आर्मडीलो प्राण्यावर होत नाही कशाचाच परिणाम
वॉशिंग्टन : पृथ्वीवर नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या सर्वच प्राण्यांना निसर्गाने त्याचे असे एक सुरक्षा कवच बहाल केलेले असते बाह्य हल्ला किंवा आक्रमणाला परतवून लावण्यासाठी हे सुरक्षा कवच महत्त्वाचे ठरते. आर्मडिलो असाच एक अनोखा प्राणी आहे.
ज्याला निसर्गाने एक बुलेटप्रूफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे त्याच्या शरीरावर गोळीबाराचा किंवा इतर कोणत्याही बाह्य हल्ल्याचा कोणताही परिणाम होत नाही आर्मडिलोला नैसर्गिक दृष्ट्याच एक सुरक्षा कवच मिळाले आहे .
जे एखाद्या बुलेटप्रूफ जॅकेटप्रमाणे काम करते त्यामुळे गोळीबार करून या प्राण्याची शिकार करणे अशक्य मानले जाते कारण त्याच्या वर गोळीबाराचा कोणताही परिणाम होत नाही या प्राण्याचे संपुर्ण शरीर अनोख्या सुरक्षा कवचने झाकलेले असते या प्राण्याला जर बाह्य धोक्याची जाणीव झाली तर आपोआप त्याच्या भोवती या सुरक्षा कवचाची गुंडाळी केली जाते .
त्याचे संपूर्ण शरीर या सुरक्षा कवचामध्ये गुंडाळले जाते आणि बाह्य हल्ल्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही सोशल मीडियावर एका युजरने या प्राण्याचा फोटो पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा या प्राण्याच्या अनोखेपणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.