आमदार सुनिल टिंगरे यांचा उपक्रम
येरवडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नातून गरीब व गरजूंसाठी वडगावशेरी मतदारसंघामधील विश्रांतवाडी, बी.आर.टी स्टॉप समोर प्रथमच प्रथमच शिवभोजन थाळी चालू करण्यात आली.
लॉकडाउनच्या काळात अनेक नागरिकांच्या एकवेळच्या जेवणाची सोय होत नसताना आमदार सुनिल टिंगरे यांनी हा उपक्रम सुरु केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सध्या 200 ते 225 जणाना ही शिवभोजन थाळी दिली जात असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास टिंगरे, रवि टिंगरे, पंकज निकाळजे, राहुल टेकवडे, धिरज शुक्ला हे कार्यकर्ते हा उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहेत. तसेच येत्या काही दिवसात वडगावशेरी मतदारसंघात अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी चालू करण्यात येणार आहे.