राजगुरूनगर | राजगुरुनगर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजून आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक विजया शिंदे यांनी केले.