सिंधुदुर्ग – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान राणे यांना काल अटक व जामिनही देण्यात आला आहे. मात्र हा वाद आणखी सुद्धा निवळलेला दिसून येत आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला झाला आहे.
काल रात्री उशिरा अज्ञातांनी विनायक राऊत यांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकून पलायन केले आहे. खासदार विनायक राऊत यांचे घर मालवण तालुक्यातील तळगावमध्ये घर आहे. या घरात राऊत यांचे निकटवर्तीय नातेवाईक राहतात. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक तळगाव येथे दाखल झाले.
याप्रकरणी राऊत यांच्या नातेवाईकांनी मालवण तालुक्यातील कट्टा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.