फडणवीसच नेतृत्व करतील हे शिवसेनेला कळवले आहे – भाजप

नवी दिल्ली: राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही मते शिवसेना व्यक्त करू शकते पण महाराष्ट्राच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जात आहेत आणि तेच नेतृत्व करतील असे शिवसेनाला स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव यांनी आज दिली. यादव हे पक्षाचे महाराष्ट्र शाखेचे निवडणूक निरीक्षकही आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या दाव्या विषयी ते म्हणाले की प्रत्येक पक्षाला त्यांची इच्छा, मनोदय व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

पण आम्ही आमची फडणवीस यांच्या विषयीची भूमिका त्यांना आधीच स्पष्ट केली आहे. आम्ही मित्र पक्षांना नेहमीच योग्य ते प्रतिनिधीत्व देत आलो आहोत. शिवसेना हा भाजपचा एनडीएतील सर्वात जुना मित्र पक्ष आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.