शिंदे वासुली -चाकण औद्योगिक वसाहतीत टप्पा दोनमधील शिंदे वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे येथील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थी शिवरायांचे मावळे, राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी अशी वेशभूषा करून ढोल-ढोल ताशा व लेझीम लावून संपुर्ण गावामधून मिरवणूक काढण्यात आली.
शाळेमध्ये बालसभेचे आयोजन केले होते. वराळेच्या शिक्षिका सोनाली लोंढे यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे, मुख्याध्यापिका शीतल बनसोडे, मनिषा कुंभार, पल्लवी कवठे, विजयालक्ष्मी जडे, सोनाली लोंढे, मरभळ व झावरे यांनी केले होते.