रेडा- इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवभोजन थाळीचा प्रारंभ इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
गोरगरीब जनतेला अवघ्या पाच रुपयांत शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अशी माहिती सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
बाजार समितीत माल खरेदी विक्रीसाठी सातत्याने मोठी वर्दळ असते. शिव भोजन थाळीचा प्रारंभ करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, सचिन देवकर, सुभाष दिवसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.